Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला! 1 एप्रिलपर्यंत एसआयटीच्या 'रडार'वर; तपासात असहकार्याचा फटका

Ashok Kharat Case | 'एसआयटी' पथकाचा न्यायालयात दावा : एक एप्रिलला पुन्हा हजर करणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाँद अशोक खरातच्या पोलिस कोठडीत ३ दिवसांची वाढ करण्यात आली. त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तो तपासात सहकार्य करत नाही अशी माहिती विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी वांगी न्यायालयात दिली. त्यामुळे खरातला पुन्हा पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली, ती न्यायालयाने मान्य करत खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची सुनावणी रविवारी (दि. २९) नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. व्ही. वराडे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायाधीशांनी खरातला, 'तुमची काही तक्रार आहे का?' असा सरळ प्रश्न विचारला, त्यावर खरातने कोणतीही भूमिका न मांडता केवळ 'नाही' असे एका शब्दात उत्तर दिले. या उत्तराने न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक ठरले.

सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना सहायक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी खरात हा संपूर्ण प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' असल्याचा ठाम दावा केला. तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्या मोबाइलमधील डेटा क्लोन करण्यात आला असून, अनेक संपर्क क्रमांक व माहिती कोडवर्डमध्ये सेव्ह केलेली आहे.

या कोडवर्डचा उलगडा करण्यासाठी आरोपीची समक्ष चौकशी आवश्यक आहे. तपासादरम्यान आणखी महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. खरातच्या मोबाइलमध्ये काही राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींची नाचे 'डमी' स्वरुपात सेव्ह केल्याचा संशय आहे.

त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आरोपी महिलांना पेहे व कडवट किंवा खारट सत्रीचे द्रव्य देत असल्याचा आरोपही सरकारी पक्षाने मांडला. है पदार्थ सेवन केल्यानंतर महिलांना गरगरणे, मळमळ होणे आणि अर्धवट शुद्धीमध्ये जाण्याची स्थिती निर्माण होत होती.

याच अवस्थेचा गैरफायदा घेत आरोपी अत्याचार करत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, खरातच्या वकिलांनी बाढीव कोठडीला विरोध दर्शवला.

मात्र, पीडितांच्या वतीने बाजू मांडणान्या वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अधिक कोठडीची मागणी केली, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर अखेर खरातच्या पोलिस फोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.

तपास यंत्रणांच्या मते, या कालावधीत डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार तसेना इतर पीडित महिलांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची चिनो आहेत.

अधिवक्ता बेंडभर व बागडे यांचा जोरदार युक्तिवाद

सरकारी अधिवक्ता किरण बेंडभर व वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातला पोलिस कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला. हे प्रकरण गंभीर आहे यामध्ये अनेक महिलांच्या जीवनाशी संबंधित अनेक बाबी घडलेल्या आहेत. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी मिळावी. यासाठी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली.

न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त

या संवेदनशील प्रकरणामुळे न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीबीएस येथील जुन्या न्यायालय इमारतीला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून चौकशीनंतरच नागरिकांना आत प्रवेश देण्यात येत होता. सुनावणीदरम्यान सुमारे सव्वा तास युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला. सुनावणीनंतर एसआयटीच्या पथकाने खरात्ला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT