नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तब्बल १३ भाषांचे ज्ञान असलेला अशोक खरातने १५० देशांचे दौरे केले आहेत. त्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या दक्षिण कोरिया दौऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये खरातचा अवतार बघण्यासारखा आहे.
आध्यात्मिक गुरू असल्याचा आव आणणारा खरात, विदेशात मात्र पूर्णपणे अवतार बदलून मौज करत असल्याचे फोटोवरून दिसत आहे. खरात काही दिवसांपूर्वी कुटुंबाबरोबर दक्षिण कोरिया येथे सहलीसाठी गेला होता. या फोटोंमध्ये तो अत्यंत मोकळ्या आणि आरामदायी शैलीत फिरताना दिसत आहे.
एका बाजूला स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणून सादर करणारा खरात, दुसऱ्या बाजूला परदेशात लक्झरी जीवन जगणारी व्यक्ती असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तपास यंत्रणांकडून सध्या त्याच्या या परदेश दौऱ्यांमागील आर्थिक स्रोतांचा शोध घेतला जात आहे.
या दौऱ्यांसाठी तो पैसे कुठून आणत होता किंवा त्याला कोण पैसे देत होते, त्याच्यासोबत अन्य कोणी परदेश दौऱ्यावर जात होते काय? याची माहिती तपास यंत्रणांकडून घेतली जात आहे. तसेच तपास यंत्रणांकडून खरातचा पासपोर्ट आणि त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे. खरातला दोन मुली आणि मुलगा असून, तेदेखील त्याच्यासोबत विदेशात भटकंती करीत असल्याचे फोटोवरून दिसून येत आहे.