Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat | भोंदू खरात पुन्हा एसआयटीच्या ताब्यात

न्यायालयीन कोठडीत खरातच्या जिवास धोका : सरकारी वकील

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांत अडकलेल्या भोंदू अशोक खरात याला सहाव्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी न्यायालयीन कोठडीच्या दरम्यान कारागृहांमध्ये भोंदू अशोक खरातच्या जिवाला इतर कैद्यांकडून धोका होऊ शकतो, अशी शंका सरकारी वकील यांनी न्यायालयात मांडली. इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याचा ताबा पुन्हा विशेष तपास पथकाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस तो एसआयटीच्या ताब्यात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरात हा एसआयटीच्या ताब्यात सत्र रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात पार पडली. यावेळी सहायक संचालक अभियोग कक्षाच्या कल्पना बेंडभर व सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी जोरदार युक्तिवाद करत प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली. तसेच न्यायालयीन कोठडीत ठेवताना आरोपीच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध राज्यातील विविध भागांत महिला शोषण व आर्थिक फसवणुकीचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्याला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली असून, त्यानंतर नाशिक, ठाणे, अहिल्यानगर आणि पुणे येथेही गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तपासादरम्यान त्याचे काही राजकीय संबंधही समोर आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्तरावरही मोठे पडसाद उमटले असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे एसआयटीकडून तपास अधिक गतीने सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT