Ashok Kharat police custody pudhari photo
नाशिक

Ashok Kharat |अशोक खरातला ९ मे पर्यंत पोलिस कोठडी

Ashok Kharat |अशोक खरातला ९ मेपर्यंत पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महिला लैंगिक अत्याचार व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याला राहाता सत्र न्यायालयाने ९ मेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन खरेदी व अवैध सावकारी प्रकरणी खरातला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.

गुलाबी टी-शर्ट आणि वाढलेली दाढी अशा अवस्थेत तो न्यायालयात खाली मान घालून स्तब्ध उभा होता. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने केवळ मान हलवून प्रतिसाद दिला.

सरकारी वकील अॅड. गौरव बोर्डे यांनी युक्तिवाद करताना व्यवहारातील संशयास्पद बाबी मांडल्या. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी एकूण १४ व्यवहारांमधून सुमारे ५ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा केला. तसेच सदर पैसा जमीन खरेदीसाठी कोठून आला.

या गुन्ह्यात त्याची पत्नीसुद्धा आरोपी असून, ती कोणत्या ठिकाणी लपलेली असेल, याबद्दल त्याला माहिती असू शकते, असा दावा केला. त्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणातील दुसरी आरोपी कल्पना खरात सध्या फरार असून, तिचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी नमूद केले. तसेच या व्यवहारांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करायचा असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT