नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या 'किंमत स्थिरीकरण निधीं' अंतर्गत करण्यात आलेल्या कांदा खरेदीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच, यात भोंदू अशोक खरातचे नाव पुढे आले आहे. भोंदू खरातच्या 'श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी 'मार्फत नाफेड कांदा घोटाळ्यात सहभाग समोर आला आहे. कंपनीला संशयास्पदरीत्या नाफेडची मान्यता मिळाली आहे.
कांदा खरेदीत १२००-१३०० कोटींचा भ्रष्टाचार जाल्याचा संशय आहे. यामुळे तपास यंत्रणांनी आपला मोर्चा याकडे वळवला असून, नाफेडच्या भ्रष्ट साखळीचे धागेदोरे अधिक गडद झाले आहेत. भोंदू खरात याचे दररोज नवनवीन कारनामे पुढे येत आहेत, बातच नाफेडच्या कांदा खरेदीत त्यांचे नाथ पुढे आले आहे.
सित्वर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील पत्त्यावर नोंदणीकृत केलेल्या श्री व्यंकटेश फार्मर प्रोडनुसर कंपनीत अशोक खरात व कल्पना खरात हे संचालक असून, त्यांच्या कंपनीला हजारो टन कांदा खरेदीचे कंत्राट मिळाले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे नीलेश शेडगे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
कंपनीच्या माध्यमातून हे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप शेडगे यांनी केरला आहे. शेडगे यांनी सांगितले की, २०२१-२२ पासून हा पोत्यळा सुरू आहे. खरातने सिन्नर तालुक्यात श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर तसेच ईशान्येश्वर फार्मर प्रोड्युसर या नावाने कंपन्या स्थापन केल्या.
शेतकऱ्यांकडून एमएसपीच्या भावाने कांदा, मका, सोयाबीन पिकांची खरेदी करत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, असा सरकारचा उद्देश आहे. मात्र, या खरातने ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्यांनी शेतवत्यांकडून माल न घेता तो थेट व्यापाऱ्यांकडून घेतला.
तो एनसीसीएफ व नाफेडला विक्री दाखवला. या प्रकरणात खरातला राजकीय नेते तसेप नाफेड व एनसीसीएच्या अधिकान्यांची मदत झाल्याचा आरोप नीलेश शेडगे यांनी केला आहे. खरातला या प्रकरणात मदत करणाऱ्यांची ईडी आणि एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा १७ ते १८ कंपन्यांत खरातचे भांडवल असल्याचे शेगडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा
या प्रकरणात 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ'च्या काही मोठ्या अधिकाऱ्यांनी खरातला मदत केल्याचे समोर येत आहे. हा केवळ आर्थिक घोटाळा नसून तो शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर मारलेला दरोडा असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ च्या बोगस कांदा खरेदीबाबत सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. परंतु, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. फोट्यवधींची घोटाळा उघडकीस येतो, हा घोटाळा दरवर्षीच होतो, तो सरकारच्या निष्क्रियतेचा आणि संगनमताचा थेट परिणाम आहे. वेळीच कारवाई झाली असती, तर सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाचला असता. काही भ्रष्ट अधिकायांकडून दलालांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर दरोडा टाकण्यात आला, आता चौकशीच्या घोषणा नकोत या प्रकरणाची उच्वस्तरीय चौकशी करत दोर्षीवर कारवाई करावी, अन्यथा कांदा उत्पादक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.- भारत दिघोळे, संस्थापक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना