Goa fish price news file photo
नाशिक

Ashok Kharat Case | शाकाहारी लोकांना खाऊ घातले मासे

Ashok Kharat Case | खरातचा धक्कादायक कारनामा: मासा पाण्यातील वनस्पती असल्याचा करायचा दावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरातचे एकापाठोपाठ एक काळे कारनामा समोर येत असून, आणखी एका धक्कादायक कारनाम्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार व कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी कारागृहात रवानगी करण्यात आलेला भोंदू खरात शाकाहारी लोकांना चक्क मासे खाण्याचे सल्ले देत असल्याची बाब समोर आली आहे.

भविष्य व ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली त्याने अनेक शाकाहारी लोकांना मासे खाण्याचा सल्ला दिला आहे. नुसता सल्लाच नाही तर त्याने त्यांना मासे खायायला सुद्धा दिल्याची माहिती उघड झाली आहे.

मासा हा 'पाण्यातली वनस्पती' असल्याचे 0 सांगून तो त्यांना मासे खाण्यास भाग पडत असे. लोकांना फसवण्यासाठी खरात वेगवेगळ्या युक्त्या वापरायचा. कोणाला मध, तर नागदेवतेची भीती घालायचा.

आता खरात मासा हा पाण्यातील वनस्पती असल्याचे सांगून शाकाहारी लोकांना प्रसाद म्हणून मासा खाण्यास सांगायचा. 'मासा कापला तर त्याला येत नाही. माशामध्ये हाडे नसतात. मासे तर पाण्यातली वनस्पती, आहेत', असे ज्ञान खरात शाकाहारी भक्तांना द्यायचा. खरातने अशाप्रकारचे सल्ले देऊन काही अनेक व्यावसायिकांना फसवल्याचा देखील संशय असून, त्यादृष्टीने देखील तपास केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

कोणी मांसाहारी किंवा शाकाहारी असणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु भोंदू खरातने त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा गंभीर गुन्हा केला आहे. त्याविरोधात फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे यावे. खरातची ही विकृती असल्याने, तो तसे करत असावा.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, 'अंनिस'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT