Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | पंचवटीतील 'त्या' बड्या डॉक्टरचे भोंदू बाबाशी काय कनेक्शन? लैंगिक शोषणात वैद्यकीय मदतीचा संशय

Ashok Kharat Case | भोंदू खरातला डॉक्टरची मिळायची विशेष साथ !

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले असून, तपासाची सुई थेट डॉक्टरांपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात खरातला मदत करणाऱ्या दोन डॉक्टरांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यापैकी एक डॉक्टर हा खरातचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे नातेसंबंधांच्या आडूनच हे संपूर्ण कृत्य राबवले गेले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण करण्यासाठी खरातने वापरलेली पद्धत तपासात उघड होत आहे.

समाजात संतापाची लाट उसळली आहे. तो स्वतःला धार्मिक शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती असल्याचे भासवत महिलांना जाळ्यात ओढत असे. 'माझ्यात देवीची शक्ती येते' असे सांगत तो महिलांवर मानसिक दबाव टाकून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

यापुढे या कृत्यानंतर महिला गर्भवती होऊ नयेत यासाठी त्यांना गर्भनिरोधक गोळ्या देण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. या औषधांचा पुरवठा डॉक्टरांच्या माध्यमातून होत असल्याचा संशय असून, दोन डॉक्टरांची नावे तपासाच्या कक्षेत आली आहेत.

यातील एक डॉक्टर पंचवटी परिसरातील नामांकित वैद्यकीय व्यावसायिक असल्याची चर्चा आहे. दुसऱ्याचा राजकीय संबंध असल्याचेही सांगितले जात आहे. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, खरातने आपले जाळे विविध क्षेत्रांत पसरवले होते.

शासकीय अधिकारी, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींशी त्याचे संबंध होते. रिअल इस्टेट व्यवहार आणि आर्थिक उलाढालीतून त्याने मोठी संपत्ती उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांसह अनेक जणांची चौकशी सुरू असून, लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT