Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case |हॉटेल व्यावसायिक शैलेश कुटे यांची सहा तास चौकशी

शैलेश कुटे यांची सहा तास चौकशी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिक शैलेश कुटे यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) तब्बल सहा तास कसून चौकशी केली. मंगळवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत महाराष्ट्र पोलिस अकादमीजवळील कार्यालयात ही चौकशी पार पडली. चौकशीनंतर त्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले.

चौकशीदरम्यान खरात आणि कुटे यांच्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार, मालमत्ता हस्तांतरण तसेच मोठ्या प्रमाणातील कॅश ट्रान्जेक्शनची माहिती तपासण्यात आली. पाथर्डी आणि मखमलाबाद परिसरातील काही संशयित जमीन व्यवहारांबाबत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

याशिवाय दोघांमधील फोन कॉल्स, संपर्क आणि संभाषणाची माहितीही तपासण्यात आली असून, त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एसआयटीला खरातचे अनेक व्यावसायिकांशी आर्थिक संबंध असल्याचा संशय आहे. संबंधित हॉटेल व्यावसायिक काही व्यवहारांत मध्यस्थीची भूमिका बजावत होता का, याचाही तपास सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या गोल्डन गैंग प्रकरणामुळेही कुटे यांचे नाव वादात आले होते. त्यामुळे या चौकशीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू असून, गरज भासल्यास शैलेश कुटे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT