Ashok Kharat Case pudhari photo
नाशिक

Ashok Kharat case |बनावट खाती उघडून ५७.९० लाखांचा गैरव्यवहार

Ashok Kharat-भोंदू अशोक खरात विरोधात सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : भोंदू अशोक खरात याचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडून तब्बल ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नारायण रामचंद्र घोटेकर (४५, रा. घोटेवाडी, ता. सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत भोंदू खरात याने जगदंबा पतसंस्थेत एकूण ३२ व्यक्तींच्या नावाने बनावट खाती उघडली.

खाते उघडताना आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच ओळखपत्रांचा वापर करण्यात आला. या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात येऊन एकूण ५७ लाख ९० हजार ९७९ रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणात अशोक खरात तसेच संबंधित पतसंस्थेचे व्यवस्थापक, कामकाज करणारे कर्मचारी व संचालक यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरून खरातविरोधात मोबदला न देता जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT