आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर Pudhari
नाशिक

आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये रंगणार आरोग्यरत्न सोहळा

आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये रंगणार आरोग्यरत्न सोहळा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'पुढारी' वृत्तपत्र समूहातर्फे नाशिक येथे 'पुढारी आरोग्यरत्न' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील नामवंत आणि प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिकांचा यावेळी गौरव होणार आहे.

या सोहळ्यात आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. मंत्री आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांवर विशेष प्रकट मुलाखतदेखील होणार आहे. या मुलाखतीतून राज्यातील आरोग्यसेवा, नवीन मोहिमा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

याशिवाय, नाशिकमध्ये पुढील वर्षी प्रस्तावित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबतही मंत्री आबिटकर आपले विचार मांडणार आहेत. सन्मान सोहळा आणि प्रकट मुलाखत असा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिग्गजांना प्रोत्साहन मिळणार असून, आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव यावेळी होणार आहे.

अधिक माहितीसह सहभागासाठी संपर्क :

नाशिक शहर - महेश अमृतकर, मोबाइल -९८६०७९८९८४, नाशिक ग्रामीण -मधुकर देवरे मोबाइल - ९०११०२३९९८

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT