Anis Objection School Girls Kanyapujan  
नाशिक

Anis Objection School Girls Kanyapujan | अनिसच्या आक्षेपानंतर नाशिकमधील शालेय मुलींचे सामूहिक कन्यापूजन व होमहवन कार्यक्रम रद्द

Anis Objection School Girls Kanyapujan | मनपा शिक्षण प्रशासनाचा निर्णय; विद्यार्थी, शिक्षकांनी सहभागी न होण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवरोत्र महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये शालेय मुलींसाठी आयोजित करण्यात आलेला सामूहिक कन्यापूजन आणि होमहवन कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अनिस) आक्षेपानंतर रद्द करण्यात आला. महापालिका, द आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्म संस्थान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मात्र, शालेय विद्यार्थ्यांना धार्मिक कर्मकांडात सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर अनिसने आक्षेप नोंदवल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण प्रशासनाने तातडीने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. नवरोत्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कन्यापूजन सोहळ्याचे पत्र समन्वयक प्रसाद पिंपळे यांच्या नावाने महापालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले होते.

या पत्रानुसार, पहिली ते चौथीतील मुलींना शनिवारी सकाळी १०.३० वाजता शाळेच्या वेळेत नाशिकमधील मध्यवर्ती ठिकाणी सामूहिक कन्यापूजनासाठी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी पूजेसह होमहवनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले होते.

कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधी हे पत्र अनिसचे राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर, अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी महापालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्याशी तातडीने संपर्क साधत या कार्यक्रमाबाबत विचारणा केली.
डॉ. चौधरी यांनी संबंधित धार्मिक संस्थेच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमासाठी संपर्क साधल्याचे सांगितले. यावर डॉ. गोराणे यांनी भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्याची आणि देशाच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाची जाणीव करून दिली.

शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे अपेक्षित असताना लहान वयातील मुलांना धार्मिक कर्मकांडात सामूहिकित्या सहभागी करून घेण्याच्या उपक्रमाचा पुनर्विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अनिसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत, शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षкаंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशा सूचना लेखी संदेशाद्वारे तातडीने संबंधित शाळांना पाठवण्यात आल्या.

'वैज्ञानिक दृष्टिकोनाला बाधो पोहोचू नये'
धार्मिक श्रद्धा आणि उपासनेच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांना सामूहिक कर्मकांडात सहभागी करून घेणे योग्य नसण्याचे अनिसचे मत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे. संस्कारक्षम वयात अवैज्ञानिक समज्युतीचे सामूहिक संस्कार होऊ नयेत, अशी भूमिका समितीने मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT