An officer on medical leave is in the ministry for transfer?
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांचे निलंबन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेवर बसण्यासाठी विशाखा समितीत काम करणाऱ्या सदस्या अधिकाऱ्याने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत थेट मंत्रालयात फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने वैद्यकीय रजा टाकत मंत्रालयात ठाण मांडल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यांकडून विरोधदेखील सुरू झाला आहे.
गत महिन्यात महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे परदेशी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली. त्यामुळे या रिक्त जागेवर बसण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. या रिक्त जागेसाठी जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या स्वीय सहायक यांचे नावे आघाडीवर आहे. तसेच जिल्ह्यात गटविकास अधिकारी म्हणून काम केलेले अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
यातच जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या अन् महिनाभरापासून चर्चेत आलेल्या विशाखा समितीतील सदस्य अधिकाऱ्याने या जागेवर डोळा ठेवून, लॉबिंग सुरू केली आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा वशिला लावल्याचे बोलले जात आहे. याशिवाय विभागीय आयुक्तालयातील एका बड्या अधिकाऱ्यांकडून शिफारस घेत मंत्रालयात फिल्डिंग लावली असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रालयात एका मंत्र्याच्या स्वीय सहायकांमार्फत बदलीची फाइल फिरविली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीनंतर अचानक वैद्यकीय रजेवर गेलेले आहेत. वैद्यकीय रजेवर असताना संबंधित अधिकारी गुरुवारी (दि. ७) मंत्रालयात वरिष्ठांच्या गाठी-भेटी घेत असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे या अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. परदेशी यांची चौकशी ज्यांनी केली, तेच अधिकारी त्यांच्या जागी बसल्यास कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे बदली नको, अशी भूमिका कर्मचारीवगनि घेतल्याचे कळते.
66 उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांची चौकशी करणाऱ्या समिती सदस्यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आहेत. यासंर्दभात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारदेखील केली आहे. त्यामुळे समिती सदस्यांतील अधिकाऱ्यांची परदेशी यांच्या जागी नियुक्ती नको. अन्यथा आंदोलन केले जाईल.दत्ता बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष