३१ डिसेंबरला रात्रभर 'सेलिब्रेशन' File photo
नाशिक

३१ डिसेंबरला रात्रभर 'सेलिब्रेशन'

मद्यविक्रीला रात्री एक, तर बिअरबार राहणार पहाटे पाचपर्यंत खुले

पुढारी वृत्तसेवा

All-night 'celebration' on December 31st

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :

मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईसह नागरिकांमध्ये उत्साह संचारला असून, शहर व जिल्ह्यात जल्लोषाची जय्यत तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शासनाने ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत 'सेलिब्रेशन'साठी परवानगी दिली आहे. असे असले तरी त्यासाठी कडक अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यतस्करीची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चोख नाकाबंदी व गस्त वाढविली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परवानगी देण्यात आली असून, परवानाधारक वाइन शॉपना मद्यविक्रीसाठी मध्यरात्री १ पर्यंत, तर परमिट बिअर बारना पहाटे ५ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. मद्यपानासाठी आवश्यक असलेले परवाने ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असून, परवाना नसलेल्या मद्यपींवर एक्साइज व पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या आदेशानुसार परराज्यातून नाशिकमार्गे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात भरारी पथके तैनात करण्यात आली असून, नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. तसेच गस्तीपथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल्स व फार्महाउसची कसून तपासणी सुरू असून, विना परवाना किंवा अवैध ओल्या पाट्र्त्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, शहर आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, तर ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार नववर्षाच्या पार्त्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. गुन्हेशाखेची पथके अमली पदार्थांच्या वापरावर विशेष लक्ष ठेवणार असून, मद्यपी, टवाळखोर व धिंगाणा करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मद्यपानाचा परवाना मद्यविक्री दुकानात एक दिवसासाठी उपलब्ध असून, तो ई-स्वरूपातही घेता येणार आहे. यासाठी https://exciseservices. mahaonline.gov.in संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT