Ajit Pawar Pudhari
नाशिक

Ajit Pawar Tribute | दादांची शेवटची सही देवळालीतील स्मशानभूमीसाठी

Ajit Pawar Tribute | सातत्याने जनसेवेचा वसा घेऊन काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवळाली मतदारसंघासाठी भरभरून मदत केली, त्यांनी शेवटची सहीदेखील सिद्ध पिंपरी या गावाच्या स्मशानभूमीच्या एक कोटीच्या कामावर केली होती.

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

सातत्याने जनसेवेचा वसा घेऊन काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवळाली मतदारसंघासाठी भरभरून मदत केली, त्यांनी शेवटची सहीदेखील सिद्ध पिंपरी या गावाच्या स्मशानभूमीच्या एक कोटीच्या कामावर केली होती. त्यामुळे आयुष्यात त्यांचे ऋण कधीही फेडता येणार नाही, असे भावनिक उद्‌गार आमदार सरोज आहिरे यांनी श्रद्धांजली सभेप्रसंगी काढले.

देवळाली मतदारसंघाच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विहितगाव परिसरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील विशेषतः शेतकरीवर्गाची फार मोठी हानी झाल्याचे सांगितले.

आ. आहिरे यांनी वडील गेल्यानंतर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अजित दादा तेदेखील नियतीने हिरावून घेतले, मी पोरकी झाली असली तरी दादांनी घालून दिलेला जनसेवेचा वसा पुढे नेऊन दादांना खऱ्या अर्थान श्रद्धांजली वाहणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तानाजी गायधनी, विष्णुपंत गायखे, निवृत्ती अरिंगळे, सोमनाथ बोराडे, दिनकर आढाव, अनिल ढिकले, संजय तुंगार, ज्ञानेश्वर गायकवाड,

दिनकर पाटील, तानाजी करंजकर, नाना चौधरी, संजय पोरजे, शरद गायखे, राजाराम धनवटे, प्रेरणा बलकवडे, अशोक सातभाई, जयंत जाधव, संतोष गायधनी, रतन जाधव, यशवंत ढिकले, आकाश छाजेड, बाळासाहेब म्हस्के, भगवान दोंदे, नामदेव कांडेकर आदींसह नाशिक तालुका व देवळाली मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक, शिवजन्मोत्सव समिती, विहितगाव ग्रामस्थ, देवळाली गाव पंच कमिटी, संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, आहिरे मित्रमंडळ आदींच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT