नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आश्रमशाळांसह वसतिगृहांमध्ये पायाभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसह सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड यांना हटवण्याच्या मागणीसाठी नाशिक येथे ४२ दिवसांपासून सुरू असलेल्या 'आदिवासी जेन झी' आंदोलनाचे रूपांतर सोमवारी (दि. २८) पायी लाँग मार्चमध्ये होऊन उलगुलान आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
विद्यार्थ्यांनी सांग काढण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी ३ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये चर्चा करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव फेटाळून लावला अन् आंदोलक थेट मोर्चावर ठाम राहिले. यावेळी 'उलगुलान' मोर्चा पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स बाजूला सारून आणि पोलिस बळाला न जुमानता मार्गस्थ झाला.
येत्या ५ ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर होणाऱ्या आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह सीपीएमचे प्रमुख अभिजित दीपक सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलकर्त्यांनी यावेळी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमधील विद्यार्थी मृत्यू आणि पायाभूत सुविधांच्या अभावी होत असल्याचा आरोप करत, याला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना जबाबदार धरत, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'आदिवासी जेन झी'चे गेल्या ४२ दिवसांपासून नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे.
मंत्री डॉ. अशोक उईके यांचा राजीनामा आणि सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड यांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी डॉ. उईके यांच्यासह अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी मागणीवर ठाम होते. सदर मागण्यांसाठी 'आदिवासी जेन झी'ने २१ सप्टेंबरला अल्टीमेटम देत २८ सप्टेंबरला मुंबईला लाँग मार्चचा इशारा दिला होता.
शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या आंदोलकांनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या दिशेने उलगुलान मोर्चा मार्गस्थ होणार असल्याने सकाळपासूनच ईदगाह मैदानावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे मैदानाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही, असे कारण देत मोर्चा अडवला आणि पुढे जाण्यापासून रोखले. मात्र, आम्ही गेल्या ४२ दिवसांपासून याठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत, या कालावधीत आमची एकही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आम्ही आता थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी घेतली.
यावेळी पोलिसांनीही बळाचा वापर करत आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे अचानक एकच गोंधळ निर्माण झाला आणि आंदोलकांनी गडकरी चौकाच्या दिशेने धाव घेत लावलेले बॅरिकेट्स बाजूला सारून मोर्चा ईदगाह मैदानाबाहेर पडले आणि पुढे घोषणाबाजी करत मुंबई नाका मार्गे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला.
प्रशासनाची विनंती आंदोलकांनी धुडकावली:
मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी दुपारी १२ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व अपर तहसीलदार अमोल निकम यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या तीन तारखेला नाशिकला येत आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत बैठक करून देऊ, त्यामुळे आजचा मोर्चा स्थगित करा, अशी विनंती आंदोलकांना राजपूत यांनी केली. आम्हाला केवळ आश्वासने दिली जातात, प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सहकार्य केले आता माघार नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारीच चर्चा होईल, असे सांगत आंदोलकांनी मोर्चा स्थगित करण्याची प्रशासनाची विनंती धुडकावून लावली.
दबाव नको थेट चर्चेला या
पोलिस, प्रशासन यांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकून आमचे आंदोलन थांबवू नये. आमच्या काही विद्यार्थ्यांना अटक झाली असली तरी कोणत्याच मागणीसाठी सुरू झालेला मोर्चा थांबणार नाही. आमच्याशी थेट चर्चा करा, आमच्या मागण्या समजून घ्या आणि त्यावर ठोस निर्णय घ्या.
- प्रशांत गावडे, आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती
मोर्चा मुंबईला पोहोचणारचसंविधानाने आम्हाला आमचे अधिकार व मागण्या मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र, पोलिसांनी आमची धरपकड करून मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जरी अटक झालेली असली तरी देखील आमचा मोर्चा मुंबईला पोहोचणारच.- सोनू गायकवाड, आंदोलन प्रमुखप्रतिक्रिया (प्रशांत गावडे):
दबाव नको थेट चर्चेला यापोलिस, प्रशासन यांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकून आमचे आंदोलन थांबवू नये. आमच्या काही विद्यार्थ्यांना अटक झाली असली तरी कोणत्याच मागणीसाठी सुरू झालेला मोर्चा थांबणार नाही. आमच्याशी थेट चर्चा करा, आमच्या मागण्या समजून घ्या आणि त्यावर ठोस निर्णय घ्या.- प्रशांत गावडे, आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती