Tribal Diwali Celebration 
नाशिक

Tribal Diwali Celebration | वाघदेवतेच्या पारंपरिक पूजेने आदिवासीबहुल कवण तालुक्यात दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ

Tribal Diwali Celebration | आदिवासीबहुल म्हणून ओळख असणाऱ्या कवण तालुक्यात वाघदेवतेच्या पूजेने आदिवासींच्या दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला.

पुढारी वृत्तसेवा

कनाशी : पुढारी वृत्तसेवा
आदिवासीबहुल म्हणून ओळख असणाऱ्या कवण तालुक्यात वाघदेवतेच्या पूजेने आदिवासींच्या दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. तालुक्यातील गंगापूर, भारडमोह, गणोरे, करभेड, लिगावे, आमदर, वंजारी, जयदर, खडकी, चणकापूर, दत्तनगर यांसह तालुक्यातील अनेक गावांत शिवारात वाघदेवतेची पूजा केली.

वाघदेवाजवळ एकत्र येऊन आदिवासी परंपरांनुसार पूजा केली जाते. याला वाघदेवाचा चिरा किंवा पाटी, असे संबोधले जाते. या वाघदेवाच्या पाटीवर चंद्र, सूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदी चित्र कोरलेली असतात. वाघदेवतेला या दिवशी प्रथमश: शेंदूर लावला जातो व दिवाळीच्या हंगामात शेतात येणारे नवीन पिके म्हणजे नागली (कनसा), भात, बाजरी, वरी, उडीद, झेंडू आदी पिकांची कणसे वाहीली जातात.

गावाच्या प्रथेनुसार भगार्फत तांदूळ, उडीद वाहून पूजा केली जाती. आदिवासी व त्यांचे गुरा-ढोरे यांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण व्हावे, यासाठी वाघदेवाची पूजा केली जात असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. दिवाळीच्या पाच दिवसांत गाईच्या रूपाने घरत लक्ष्मी येते, अशी आदिवासी समाजाची धारणा आहे. या दिवशी गुराखी कोणत्याही वाहनाचा वापर न करता पिंजळलेले गाणे गातात. गाय-गत, बैल, नागदेव, वाघदेव आदींच्या गीतातून उद्दार केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT