नाशिक

पुण्याहुन नाशिकला आलेला पर्यटक दुचाकीसह दरीत कोसळला, ग्रामस्थांमुळे यशस्वी सुटका

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- आज सोमवार (दि. 17) हरिहर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला सोहम(पूर्ण नाव माहित नाही) दुपारी चार वाजेच्या सुमारास कळमुस्ते हर्षवाडी येथून नव्याने तयार झालेल्या डांबरी रस्त्याने निरगुडपाडा येथे येण्यास निघाला असता जवळच असलेल्या वळणावर अंदाज न आल्याने थेट 6 मिटर खोल दरीत कोसळला.

निरगुड पाडयाच्या जवळच भास्करगड खानावळ आहे. तेथे बसलेल्या काही ग्रामस्थांना मोटारसायकल घसरल्याचे दिसून आले. ताबडतोब खानवाळीचे चालक श्रावण वड आणि आठ दहा ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावत सुटले. तेथे पोहचले असता सर्व प्रकार लक्षात आला. मोटारसायकल खाली चालक अडकलेला होता. सर्वांनी दरीत उडया टाकल्या व मोटारसायकल खाली अडकलेल्या पर्यटकाला मोकळे केले.

त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याने तो बचावला होता. मात्र हेल्मेटची काच तोंडावर दाबली गेल्याने श्वास कोंडला होता. ग्रामस्थांनी काच फोडत त्याचे डोके हेल्मेट वेगळे केले. त्याला दरीतून वर घेतले. त्यानंतर त्याची मोटारसायकल दोर लावून वर ओढली. त्याचे नाव सोहम असल्याचे आणि पुणे येथून आल्याचे त्याच्या सोबत आणखी एक मोटारसायकल स्वार होता त्याने सांगितले. खासगी वाहनातून सोहमला नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याचे प्राण वाचले असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी भास्करगड खानावळीला कळवले आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT