वणी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील शिवाजी रोडवरील इमारतीच्या छतावर लहान मुलानी फोडलेल्या फटाक्यामुळे आज (दि.२१) सायकांळी पाचच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या छतावर असलेल्या सोलर आणि प्लास्टिकने पेट घेतल्याने आगेने रौद्ररूप धारण केले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.
शहरातील शिवाजी रोडवर रामदास सोनवणे यांची इमारत आहे. या इमारतीच्या छतावर लहान मुलांनी फटाके फोडल्याने आचानक आग लागली. सायकांळी पाचच्या सुमारास इमारतीवर आगीचे लोळ दिसू लागले. या आगीत सोलरसह इमारतीवरील काही वस्तू जळाल्या. ही बाब लक्षात येताच परेश जन्नानी, अमित चोपडा, सुनिल शर्मा, राकेश थोरात, मयुर जैन, मनोज सोनवणे, मोदी, संदीप साखला, किशोर साखला, दिपक बोरा, सोनीलाल गायकवाड, कैलास महाले, सुमित बोरा, रोशन समदडिया, जिमेश दलाल, गणेश विसावे, संदीप चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवत इमारतीच्या छतावर चढुन आग विझविली. दरम्यान जवळपास असणाऱ्या बोरिंगच्या मोटर्सनी पाण्याचा मारा करत ही आग विझवीण्यात आली. सपोनि निलेश बोडखे ,उपसरपंच विलास कड, ग्रा.प. सदस्य राकेश थोरात यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली.
हेही वाचा :