A corrupt municipal employee and his agent caught in the trap.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जन्मदाखला देण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. या प्रकरणी सफाई कर्मचारी संशयित कैलास मधुकर साळवे (४५) आणि खासगी एजंट हरीश दिवाकर पत्की (५५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या विवाहित मावसबहिणीच्या मुलाचा जन्मदाखला मिळविण्यासाठी नाशिकरोड महानगरपालिकेच्या द्या, काम करून देतो, अशी मागणी जन्म-मृत्यू विभागात चौकशी करण्यात आली होती. हा जन्म रुग्णालयात झाल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने, ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला, त्या डॉक्टरकडून पत्र आणा, असे सांगण्यात आले.
त्यानंतर श्री हॉस्पिटलने तसे पत्र दिले असतानाही, खासगी एजंट पत्की याने तक्रारदारास माझी ओळख महापालिकेतील जन्म-मृत्यू विभागात आहे. पाच हजार रुपये केली. या लाच मागणीबाबत तक्रारदाराने २३ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
पडताळणी केल्यावर पत्की याने पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार २४ डिसेंबर २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान पत्की याने चार हजार रुपयांची लाच स्वीकारली. यानंतर पत्की याने लोकसेवक कैलास साळवे याच्याशी संपर्क साधून रक्कम स्वीकारली आहे, अशी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले असून, दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.