जात प्रमाणपत्र वेळेत दाखल न करणे भोवले pudhari photo
नाशिक

caste validity certificate issue : जात प्रमाणपत्र वेळेत दाखल न करणे भोवले

सिन्नर तालुक्यातील 79 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपूनही संबंधित सदस्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने सिन्नर तालुक्यातील तब्बल 79 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 10-1अ नुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी ही कारवाई केली आहे. एकाचवेळी इतके सदस्य अपात्र झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सन 2019 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अनेक वेळा शासनाकडून मुदतवाढही देण्यात आली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी ठरावीक कालावधीत जातपडताळणीचे प्रमाणपत्र सादर करणे कायदेशीर बंधनकारक असते. मात्र, यातील अनेकांनी अंतिम मुदत संपल्यानंतरही प्रमाणपत्र सादर केले नाही. वारंवार मागणी करूनही आजतागायत 79 सदस्यांचे जातपडताळणीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही.

परिणामी, अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी सर्व सदस्यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहे. या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम होणार असून, नव्याने निवडणुका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या ग्रामपंचायतींतील सदस्यांचा समावेश

सोनांबे, विंचूर दळवी, चंद्रपूर, मुसळगाव, निमगाव, देवपूर, धोंडबार, सांगवी, धारणगाव, ब्राह्मणवाडे, मळ खु., देशवंडी, निर्‍हाळे, चिंचोली, सोनारी, मेंढी, औंढेवाडी, आटकवडे, सावतामाळीनगर, दत्तनगर, पांगरी बु., कोनांबे, बेलू, चास, पिंपळे, बोरखिंड, आडवाडी, मलढोण, जामगाव, रामनगर, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, वडझिरे, हिवरे, केपानगर, यशवंतनगर, वडगाव सिन्नर, नळवाडी, खंबाळे, पाथरे बु., कुंदेवाडी, सोनगिरी, कणकोरी, चोंढी, पुतळेवाडी, शिवडे, आशापुरी, घोटेवाडी, फर्दापूर, दहीवाडी, दातली, पिंपळगाव, भरतपूर, दोडी खु., कोमलवाडी, बोरखिंड, सरदवाडी, पांढुर्ली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT