kidney donation : आईच्या किडनीदानाने तरुण मुलास नवे जीवन Pudhari
नाशिक

Grandmother Donates Kidney | नाताच्या प्रेमापोटी 62 वर्षीय आजीने दिली किड नी! मविप्र रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण

Grandmother Donates Kidney | 62 वर्षीय आजी अन् 22 वर्षीय नातवावर मविप्र रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते किती विलक्षण असते, याची हृदयस्पर्शी अनुभूती आडगाव येथील मविप्र रुग्णालयात आली. ६२ वर्षीय आजीने २२ वर्षीय नातवाला किड नीदान करून त्याला नवजीवनाची अमूल्य भेट दिली. मृत्यूशी झुंजणाऱ्या नातवासाठी आजीने स्वतःचा अवयव देण्याचा घेतलेला निर्णय वैद्यकीय क्षेत्रासोबतच माणुसकीच्या नात्यांनाही भावुक करणारा ठरला.

तसेच मविप्र रुग्णालयातील अत्याधुनिक किड नी ट्रान्सप्लांट युनिटमध्ये आणखी एका रुग्णामध्येही यशस्वी किड नी प्रत्यारोपण करण्यात आले. दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना नुकताच सुरक्षितपणे डिस्चार्ज दिला.


मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मविप्र रुग्णालयात यापूर्वी दोन यशस्वी किड नी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यानंतर नव्याने झालेल्या या दोन जटिल प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमुळे नाशिकच्या वैद्यकीय सेवाक्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

एका बाजूला वृद्धेने आपल्या नातवाच्या आयुष्यासाठी किड नीदान केले, तर दुसऱ्या रुग्णालाही अत्यंत बिकट वैद्यकीय परिस्थितीतून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. या संपूर्ण वैद्यकीय मोहिमेत सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. कैलास मोगल, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कोडीलकर, उपवैद्यकीय अधीक्षक मंगेश जाधव आणि अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांच्या समन्वयातून नेफ्रॉलॉजी, सर्जरी आणि भूलशास्त्र विभागाने एकत्रितपणे काम केले.


नेफ्रॉलॉजी विभागाचे डॉ. विपुल गटानी, डॉ. अभिजित मोरे, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. पार्थ देवगावकर, सर्जरी विभागाचे डॉ. नंदन विळेकर, डॉ. पुष्पेंद्र सहाणे, डॉ. अभिनव गाडे, डॉ. अभयसिंग वालिया, डॉ. राजेंद्र नेते, डॉ. प्रणव छाजेड, भूलशास्त्र विभागाच्या डॉ. अलका कोशिरे, डॉ. हेमंत पवार, डॉ. प्रमोद, डॉ. पूनम धुर्वे तसेच नर्सिंग हेड गोरख बागूल यांच्यासह प्रशिक्षित कर्मचारी वर्गाने अहोरात्र मेहनत घेतली. या यशाबद्दल मविप्रचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टरांची संपूर्ण टीम आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मविप्र रुग्णालयात आता अद्ययावत किड नी प्रत्यारोपण सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहे. निष्णात आणि अनुभवी डॉक्टरांची टीम, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, विशेष आयसीयू आणि समर्पित सपोर्टिंग स्टाफच्या जोरावर आपण ही किमया साधू शकलो.
— ॲड. नितीन ठाकरे, मविप्र सरचिटणीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT