मालेगावात पुन्हा एकदा 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडल्याने मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे. पीडित बालिकेला दिपक धनराज छाजेड रा. मालेगांव जि नाशिक, वय वर्ष अंदाजे 55, या संशयित आरोपीने फूस लावून त्याच्या स्कुटीवर बसवून एका पडीत जागेवर घेऊन जाऊन अत्याचार केले.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. नु
कतीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करत तिचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना, जनतेचा रोष अजूनही ताजा असताना अशी घटना पुन्हा घडल्याने यावर शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी आता जनतेकडून करण्यात येत आहे.