Death Pudhari
नाशिक

Crime Case | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

Crime Case | त्र्यंबकेश्वरपासून जवळ असलेल्या सापगाव येथील आर्यत सोमनाथ कांबळे (१८) या युवकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वरपासून जवळ असलेल्या सापगाव येथील आर्यत सोमनाथ कांबळे (१८) या युवकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबात मताचा चुलतभाऊ रोशन कांबळे याने याबात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

दाखल फिर्यादीनुसार गुरुवारी (दि. ५) रात्री ९ च्या सुमारास शिरसगाव येथील संशयित आदित्य एकनाथ मोंढे याने सापगाव फेरी मार्गावर आर्यत याच्या पोटाट डाव्या बाजूला धारदार चाकू भोसकला. तसेच गळ्यासह छाती व हातावर वार केले. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन आर्यतचा मृत्यू झाला.

संशयित आदित्याने त्याच्या बहिणीसोबत आर्यतचे प्रेमसंबंध असल्याचा राग व्यक्त करत त्याला समझावून सांगतो म्हणून सापगाव रस्त्यावर स्मशानभूमीलगत घेऊन जाऊन चाकूने भोसकला. जखमी आर्यटने मदतीसाठी आराडाओरडा केला असता बाजूला थांबलेले त्याचे सोबती व चुलतभाऊ धावत गेले.

चाकूचे वार करणारा आदित्य याने आपण जे करायचे ते केले आहे, असे म्हणत निघून गेला. जखमी आर्यतला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तो मृत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. दरम्यान, या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर अशा प्रकारे खुलेआम चाकूहल्ले होते आणि खून होतो. या प्रकाराने परिसर हादरला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी एकादशी होती आणि पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत फेरीमार्गावर निवृत्तिनाथांची पालखी घेऊन गेलेले वारकरी चालत होते. फेरीमार्गावर असलेल्या वारकरी भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेने ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT