उत्तर महाराष्ट्र

Nashik : सलग 26 तास योगासने करीत नाशिकच्या डॉ. पटणी यांचा नवा विक्रम

गणेश सोनवणे

नाशिक : प्रतिनिधी
प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ तथा गीत योगा अ‍ॅण्ड फिटनेस अकॅडमीचे डायरेक्टर डॉ. पराग पटणी यांनी सलग 26 तास 30 मिनिटे योगासने करीत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. लवकरच त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे.

योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी ही विक्रमी कामगिरी केली आहे. गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आतापर्यंत सलग योगासने करण्याचा विक्रम 24 तासांचा आहे. डॉ. पटणी यांनी 26 तास 30 मिनिटे योगासने करून हा विक्रम मोडीत काढला आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजता त्यांनी योगासने करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 48 तास सलग योगासने करण्याचा त्यांचा मनोदय होता. मात्र, या दरम्यान त्यांच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्यांनी 24 तासांचा विक्रम मोडीत काढला. यावेळी त्यांनी साधारणत: 2 हजार 992 पेक्षा अधिक सलग योगासने केली आहेत.

लवकरच होणार घोषणा
या कामगिरीसाठी त्यांची पत्नी योगातज्ज्ञ डॉ. काजल पटणी, मुलगी गीत पटणी यांची मोठी मदत झाली. दरम्यान, त्यांच्या या कामगिरीची संपूर्ण माहिती गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविण्यात आली असून, याबाबतची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT