उत्तर महाराष्ट्र

Nashik ZP : आरोग्य विभागाच्या 61 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

गणेश सोनवणे

नाशिक पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून सामान्य प्रशासन, वित्त आणि कृषी यांनंतर उद्या शुक्रवारी (दि. 26) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य विभागातील विविध संवर्गाच्या बदल्या होणार आहेत. आरोग्य विभागांतर्गत आरोग्य कर्मचारी संवर्गातील आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सहाय्यक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (पुरुष), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी) या 7 संवर्गातील बदल्या करण्यात येणार आहे.

बदली प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात एकूण 460 आरोग्य सेवक (महिला) कार्यरत असून 5 टक्क्यांप्रमाणे 23 विनंती बदल्या करण्यात येणार आहे. तर आरोग्य सहाय्यक (महिला) संवर्गात 31 कर्मचारी असून याअंतर्गत 2 बदल्या करण्यात येणार आहे. या दोन संवर्गात एकूण 25 बदल्या करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गात 358 कर्मचारी कार्यरत असून 5 टक़्के प्रमाणे 20 बदल्या करण्यात येणार आहे. तर आरोग्य सहाय्यक (पुरुष) 145 कार्यरत असून 5 टक्के प्रमाणे 8 बदल्या करण्यात येणार आहे. या दोन संवर्गात एकूण 28 बदल्या करण्यात येणार आहे. औषध निर्माण अधिकारी संवर्गात 101 अधिकारी कार्यरत असून 5 टक्के प्रमाणे 5 बदल्या करण्यात येणार आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गात 57 तंत्रज्ञ कार्यरत असून 3 बदल्या करण्यात येणार आहे. आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी) संवर्गात 15 पर्यवेक्षक कार्यरत असून 5 टक्के नियमाप्रमाणे विस्तार अधिकारी बदलीस पात्र ठरलेले नाहीत. आरोग्य कर्मचार्‍यांच्या 7 संवर्गात एकूण 61 बदल्या करण्यात येणार आहे. याचबरोबर 5 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांच्या आपसी बदल्या देखील राबविण्यात येणार आहे.

यास्तव सर्व आरोग्य कर्मचार्‍यांच्या शासन निर्णय 15 मे 2014 मधील प्रकरण 3 च्या तरतुदी नुसार तालुकास्तरावर तालुका अंतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्या नमुद टक्केवारी प्रमाणे करण्यात येणार आहे आरोग्य विभागात आरेाग्य सेवक (महिला) 23, आरोग्य सहाय्यक (महिला) 2, आरोग्य सेवक (पुरुष) 20, आरोग्य सहाय्यक (पुरुष) 8, औषध निर्माण अधिकारी 5, प्रयोग शाळा तंत्रज्ञ 3, अशा एकूण 61 बदल्या करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक प्रशासन अधिकारी पवार यांनी दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT