उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वळणावर चारीत पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : वाघाड उमराळे बुद्रुक रस्त्यावर वाघाडकडून येणार्या दुचाकीस्वारास रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्यामुळे चारीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमराळे येथे रहिवासी असलेले मोहन एकनाथ थेटे हे निगडोळ येथील बहिणीकडे काही कामानिमित्त दुचाकीने (एएमएच 15 एचएफ 3393) गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास निगडोळ येथून वाघाड, उमराळे बुद्रुक रस्त्यावरुन जात होते. यावेळी धामण टेक वळणावर अंदाज न आल्याने मोटरसायकल रस्त्याच्या कडेवरील चारीत आदळली. झालेल्या अपघातात थेटे यांच‌ा जागीच मृत्यू झाला. उमराळे बुद्रुक येथील पोलीस नाईक धनंजय शीलवटे यांनी पंचनामा केला. दरम्यान, या रस्त्यावर पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही वळणावर सूचना फलक लावले नसल्याने वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT