उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रस्ता दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

गणेश सोनवणे

नाशिक : रस्ता दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. यात लखन चंपालाल पाटील (२८, रा. पाथर्डीफाटा) या युवकाचा मृत्यू झाला आहे.

लखन पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून येत असताना पाथर्डी सर्कल परिसरात दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधी त्यांचा गुरुवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT