उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भवरलाल जैन यांना ’भक्तिसंगीत संध्ये’तून आदरांजली

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रुजविणार्‍या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांचा आज श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून 'भक्तिसंगीत संध्ये'तून विद्यार्थ्यांकडून कीबोर्डसह इतर वाद्यांच्या साथसंगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले.

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून 'स्वरानुभूती' या पद्मश्री भवरलाल जैन स्मृती संगीत समारोहात 'भक्तिसंगीत संध्या' झाली. भाऊंच्या उद्यानामधील म्पी थिएटर येथे झालेल्या 'भक्तिसंगीत संध्या'चे कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशन सिस्टिमचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, प्रवीण जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. गुरू आणि शिष्य यांच्या नात्यातील भावार्थ समजून सांगणारे 'है प्रार्थना..' या गीताने भक्तिसंगीत संध्याची सुरुवात झाली.

अहिंसा, सद्भावनेचा संदेश : समानता आणि मानवतेचा संदेश देणारे साने गुरुजींचे 'खरा तो एकची धर्म' हे गीत सादर केले. भवरलाल जैन यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. दुसर्‍यांचे दुःख समजून त्यांच्या मदतीला धावून येणे म्हणजे पुरुषार्थ असे ते मानत हेच अधोरेखित करणारे 'वैष्णव जन तो..' हे सादर करून विद्यार्थ्यांनी अहिंसा, सद्भावनेचा संदेश दिला. 'तेरा मंगल मेरा मंगल' या गीताने समारोप झाला. प्रा. शशांक झोपे यांनी प्रेक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT