उत्तर महाराष्ट्र

नाशिक : लखमापूरला एव्हरेस्ट इंडस्ट्रिज लिमिटेड प्लांटतर्फे वृक्षारोपण

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

जागतिक पर्यावरणदिनी लखमापूर येथे एव्हरेस्ट इंडस्ट्रिज लिमिटेड प्लांटतर्फे कंपनीच्या अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांसोबत एक दिवस पर्यावरणासोबत राबविला. तसेच प्लांट क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण दिन कार्यक्रमात प्लांट हेड विजयेंद्र बाबू अध्यक्षस्थानी होते. प्रत्येकाने पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे कोणतेही काम न करता पर्यावरण जोपासण्याची शपथ त्यांनी कर्मचार्‍यांना दिली. तसेच वैयक्तिकपणे किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. जेपी इन्फ्राचे कुणाल मयेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी वर्षाचे संपूर्ण 365 दिवस पर्यावरण दिवस समजून पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी लखमापूर प्लांटचे सुरक्षा अधिकारी संजय साहू यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी विविध रोपट्यांची लागवड केली. कार्यक्रमाप्रसंगी अनिर्बन कुंडू, निधी थिगळे, अखिलेश गुप्ता, श्रीराम बोरसे, अरुण विजयन, पी. के. मिश्रा, अमोल जगताप, योगेश कदम आदी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT