उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘चला नदीला जाणू’चा कलश गोदामाई संस्थकडे सुपूर्द

अंजली राऊत

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'चला नदीला जाणू या' या उपक्रमांतर्गत गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मंगल कलश सुपूर्द करण्यात आले. नवीन नाशिक येथील गोदामाई संस्थेकडे मंगल कलश सुपूर्द करीत नंदिनी नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्प करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या डोंगरावर गोदावरीच्या उगमस्थानी गंगाद्वार येथे विविध मान्यवरांच्या हस्ते मंगल कलश 'नाशिकची आई, गोदामाई..!' संस्थेच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नंदिनी नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्प करीत थेट कामास सुरुवात करण्यात आली. अविरल गोदावरीसाठी आता संत, शासन आणि समाज एकत्र आल्याने आदर्श कार्य उभे राहिले, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन, रोहित कुलकर्णी, रोहन कानकाटे, रवि वाघ, संदीप दिघे, रामेश्वर महाजन, रोहित ताहाराबादकर, पंकज महाजन, मयूर लवटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे लोकआयुक्त व माजी न्यायाधीश अंबादास जोशी, नमामि गोदा फाउंडेशनचे सदस्य आणि या उपक्रमाचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, 'नदीला जाणू या' उपक्रमाच्या राज्य समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, माहिती प्रसारणचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जलबिरादरीचे विनोद बोधनकर, नरेंद्र चुग, स्मार्ट सिटीचे पी. बर्डे, गणेश भोळे, सरपंच जगन झोले, वनाधिकारी गणेशराव झोले, सत्संग फाउंडेशनच्या एम वसुकी, अभिनेते किरण भालेराव, धीरज बच्छाव, राहुल रायकर, नितीन हिंगमिरे यांच्यासह सत्संग फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT