नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात गुरूवारी (दि. १९) झालेल्या लिलावात टोमॅटोच्या 20 किलोच्या प्रती जाळीला कमाल १२७५ रुपये तर किमान ८५० रुपये भाव मिळाला. शेतकऱ्यांनी शरदचंद्रजी मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन यावा, असे आवाहन प्रशासक फैयाज मुलाणी व सचिव अरुण काळे यांनी केले आहे.
सद्यस्थितित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत त्र्यंबक, निफाड़, दोडी, संगमनेर व सिन्नरसह शहरालगत असलेल्या गावांमधून टोमॅटोची आवक होत आहे. यात सर्वांधिक टोमॅटो आवक ही सिन्नर येथून होत आहे. सध्या टोमॅटोला भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे मालाची आवकही वाढली आहे. गुरूवारी नाशिक मार्केटमध्ये १७ हजार ५२२ जाळ्यांची आवक झाली असून, जाळीला कमाल दर १२७५ रुपये तर सरासरी ८५० रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.