उत्तर महाराष्ट्र

नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

अंजली राऊत

नाशिक (लोहोणेर)  :  पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील गिरणा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या परप्रांतीय युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले आहे. स्थानिक पट्टीच्या पोहणार्‍यांना मंगळवारी (दि.23)दुपारी मृतदेह बाहेर काढला. रविवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास सटाणा येथील रामलखन प्रजापती या परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने गिरणा पुलावरून नदीत उडी मारली होती. पुलावरील स्कूटी व मोबाइलवरून त्याची ओळख पटली होती. मात्र, मृतदेह मिळून आला नव्हता. एनडीआरएफच्या जवानांचीदेखील मदत घेतली गेली. मात्र, त्यांनाही अपयश आले होते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास गिरणा पूलाच्या पूर्व बाजूला असलेल्या बंधार्‍याजवळ स्थानिक दिलीप फकिरा आहिरे यांना मृतदेह सापडला. कोळीवाड्यातील पट्टीच्या पोहणार्‍यांनी ही मोहीम यशस्वी केली. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह आप्तांच्या ताब्यात देण्यात आला. देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT