उत्तर महाराष्ट्र

नाशिक : दत्त चौक येथे हातात कोयते नाचवित दहशत

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील दत्तचौक येथे अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात जोरजोराने शिवेगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सिडकोतील दत्त चौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ रविवारी (दि. 19) रात्री 8 ते 9 च्या सुमारास अज्ञात चार ते पाच टवाळखोरांनी परिसरातून पायी चालत जोरजोरात शिवीगाळ केली, यातील एक ते दोन टवाळखोरांच्या हातात धारदार कोयते होते. टवाळखोर फोनवर कोणाशी तरी संपर्क साधत जोरदार शिवीगाळ करीत भर रस्त्यात कोयते आपटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दर सात ते आठ दिवसांनी हे टवाळखोर दत्त चौक भागात दहशत पसरवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत अंबड पोलिसांकडे तक्रारी करूनही टवाळखोरांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. अंबड पोलिस येताच टवाळखोर जागेवरून पळ काढत असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT