उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जलतरण तलावावर टोळक्याकडून तोडफोड

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबक रोडवरील वि. दा. सावरकर जलतरण तलावात गुरुवारी (दि. 21) सायंकाळी प्रवेश करण्याच्या कारणावरून काही संशयितांनी धुडगूस घातला. या टोळक्याने जलतरण तलावातील तिकीट काउंटरवर गोंधळ घालत शिवीगाळ केली. तेथील शॉवरसह नळ व पाइपची तोडफोड केली. त्यामुळे गोंधळ उडाला होता.

पोलिसांना माहिती दिल्यानंतर टोळके पसार झाले. या प्रकरणी टोळक्याविरोधात सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आले असून, तक्रार नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. घटनेनंतर सरकारवाडा पोलिस व बीट मार्शलने संशयितांचा शोध घेतला, मात्र यश आले नाही. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असावा, अशी मागणी व्यवस्थापक आर. पी. काठे व अन्य कर्मचार्‍यांनी केली आहे. तसेच या घटनेची माहिती कळताच आमदार देवयानी फरांदे यांनी तरण तलाव येथे जाऊन पाहणी केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT