उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सिडकोत त्रिमूर्ती चौकात संशयास्पद मृत्यू

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील डॉ. हेडगेवारनगर येथील कैलास बाबुराव साबळे (४५ ) यांचे राहते घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस पुढील तपास करीत आहे.

मयत साबळे यांचा कॅनडा कॉर्नर परिसरात चायनिज गाडीचा व्यवसाय आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला मित्राने घरी पोहचविले होते. साबळे याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्या जखमेवर हळद लावलेली होती. रात्री उशिरा घरी आल्यानंतर ते झोपी गेले असता सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या वार्ताने परिसरात खळबळ उडाली आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अंबड पोलिस पुढील तपास करीत आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुली  असा परिवार आहे. शवविच्छेदनाच्या अहवानंतरच पुढील तपासाबाबत पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT