उत्तर महाराष्ट्र

नाशिक : कादवा कारखाना निवडणुकीत श्रीराम शेटे विजयी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा :  कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सोसायटी गटातून कादवा विकास पॅनलचे श्रीराम शेटे हे विजयी झाले आहेत. याशिवाय दिंडोरी गटातील सत्ताधारी श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

कादवा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि. 3) मतदान झाले. श्रीराम शेटे यांनी 35 पैकी 26 मते मिळवत परिवर्तन पॅनलचे संपतराव वक्ते यांचा पराभव केला आहे. तर संपतराव वक्ते यांना केवळ 9 मतांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीचा संपूर्ण निकाल लवकरच हाती लागण्याची शक्यता असून, त्यात दोन्ही पॅनलच्या पदाधिकार्‍यांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शेटे यांच्या विजयामुळे कादवा विकास पॅनलमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मिळालेली मते- अनिल जाधव 4193, दिलीप जाधव 66, प्रवीण जाधव 114, दिनकर जाधव 6676, बाळासाहेब जाधव 6404, प्रमोद देशमुख 4130, श्रीपत बोरस्ते 4043, शहाजी सोमवंशी 6277

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT