उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ओझरमध्ये देखील अपहरणाच्या अफवाच

अंजली राऊत

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
येथील वीटभट्टीजवळून परिसरातील एका विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींचे अपहरण झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर गुरुवारी सकाळी व्हायरल झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, ओझर शहर पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर हा प्रकार हा गैरसमजातून झाल्याचे समोर आले. त्यामुळे अशा प्रकारे गैरसमज पसरविणार्‍या शाळा, महाविद्यालयीन मार्गावरील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

सध्या सोशल मीडियावर अपहरणाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, त्यातील खरे-खोटे याबाबत शहानिशा करणे आवश्यक झाले आहे. अशा प्रकारे ओझर येथे सोशल मीडियात पोस्ट व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही पोस्ट अफवा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल नसून, नागरिकांनी अफवांना बळी न पडता, काही संशयास्पद गोष्टी वाटल्यास पोलिसांना माहिती कळविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी केले आहे. दरम्यान, ओझर शहरातील विविध शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. यात माधवराव बोरस्ते विद्यालय, नवीन इंग्रजी शाळा या शाळांबाहेर काही टवाळखोर थांबून विद्यार्थिनींची छेड काढतात. त्यांना समज देऊनही उपयोग होत नसल्याने पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश महाले, नितीन काळे यांनी पोलिस निरीक्षक रहाटे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT