उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘कादवा’साठी विक्रमी 93 टक्के मतदान

गणेश सोनवणे

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
कादवा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि. 3) मतदान झाले. उन्हाच्या कडाक्यातही सरासरी 93 टक्के मतदान झाल्याने वाढीव मतदानाचा लाभ कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
कादवा विकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. त्यात दोन्ही पॅनलच्या पदाधिकार्‍यांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे.

मतमोजणी सोमवारी (दि. 4) दिंडोरीतील सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज आहे. सकाळपासूनच कादवा विकास पॅनलच्या वतीने पॅनलप्रमुख श्रीराम शेटे यांच्यासोबतच विधानसभाअध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ, दत्तात्रय पाटील आदी प्रचारात सक्रिय होते.

तसेच परिवर्तन पॅनलच्या बाजूने शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले आदींनी मतदारांना मतदानासाठी आवाहन केले होते. एकूण पाच गटांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यात कसबे वणी, दिंडोरी, मातेरेवाडी, चांदवड व वडनेर भैरव येथे निवडणूक केंद्रे होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT