नाशिकरोड, प्रतिनिधी
उरई येथील रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस ब्रज सिंग हे नाशिक रोड रेल्वे स्थानकात तपासासाठी आले असता त्यांचे पाच हजार रुपये रोख असलेले पैशाची पाकीट हरवले. त्यात ओळखपत्र, डेबीट कार्ड होते.
पोलिस हवालदार संतोष उफाडे यांना ते रेल्वेस्थानकात सापडले. त्यातील मोबाईल क्रमांकावर फोन करून मालकाचा शोध घेऊन उफाडे यांनी ते प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रज सिंग यांना परत केले.