उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एक ठार

अंजली राऊत
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पुढच्या दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत मृताचे भाऊ राजेंद्र देवराम आहेर (५१, वडाळीभोई) यांनी फिर्याद दिल्याने होंडा कंपनीच्या अज्ञात दुचाकी चालकाविरोधात वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळीभोई येथील विजय देवराम आहेर हे मोटरसायकलने (एमएच 15, 6703) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिकच्या दिशेने चालले होते. यश पेट्रोलपंपासमोर असताना पाठीमागच्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल (एमएच 41, एम 4336) वरील अज्ञात मोटरसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्याने आहेर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विजय आहेर यांची दुचाकी महामार्गावरील दुभाजकाला जाऊन आदळल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर अज्ञात मोटरसायकल चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेबाबत मृताचे भाऊ राजेंद्र देवराम आहेर यांनी वडनेरभैरव पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात दुचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक व्ही. एन. घुमरे करीत आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT