उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा : प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींवर बुधवारी सुनावणी, आठ टप्प्यांत प्रक्रिया

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी मनपा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवरील प्राप्त 211 हरकतींवर येत्या बुधवारी (दि.23) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत सुनावणी होत आहे. प्राप्त हरकतींची 94 गटांत विभागणी करण्यात आली असून, एकाच दिवसात आठ टप्प्यांत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत गेल्या 1 फेब—ुवारी रोजी आरक्षणविरहित प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभागरचनेवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 14 फेब—ुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत तब्बल 211 हरकती दाखल झाल्या आहेत. यात मुख्यालय राजीव गांधी भवनात सर्वाधिक 131 हरकती प्राप्त झाल्या. त्याखालेखाल सातपूर विभागातून 25, नवीन नाशिक 22, नाशिकरोड 16, पंचवटी 13 तर, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम प्रत्येकी दोन हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाने या हरकतींच्या छाननीसाठी चार पथके नियुक्त केली होती. छाननीअंती येत्या बुधवारी, दि. 23 फेब—ुवारी रोजी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील आयुक्त कार्यालयाशेजारील सभागृहात सुनावणी होत आहे.

यासाठी प्राप्त हरकतींची 94 गटांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या 1 ते 10 गटांत 54 हरकती असून, सकाळी 10 ते 11 दरम्यान या हरकतींवर सुनावणी दिली जाणार आहे. 11 ते 20 गटांतील 50 हरकतींवर 11 ते 12, 21 ते 30 गटांतील 43 हरकतींवर दुपारी 12 ते 1, 31 ते 42 गटांतील 12 हरकतींवर दुपारी 1 ते 2 यावेळेत सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते 3 दरम्यान जेवणाची सुटी असणार असून, दुपारी 3 नंतर पुन्हा सुनावणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यात 43 ते 54 गटांतील 12 हरकतींवर दुपारी 3 ते 4, 55 ते 66 गटांतील 12 हरकतींवर दुपारी 4 ते 5, 67 ते 78 गटांतील 12 हरकतींवर सायंकाळी 5 ते 6 व 79 ते 94 गटांतील उर्वरित 16 हरकतींवर सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

प्रभागरचनेवरील हरकती…

हरकतींचा प्रकार संख्या
हद्दीबाबत……………………….. 201
वर्णनाबाबत……………………… 2
नावाबाबत………………………. 2
आरक्षणाबाबत…………………… 1
इतर…………………………….. 5
एकूण…………………………… 211

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT