नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या वर्षी जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतींमध्ये चुकीची प्रभागरचना आणि आरक्षण साेडत काढल्याने निवडणुका होऊ शकल्या नाहीत. यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार या सर्व ठिकाणासह जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी अशा ४८ गावांत नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार शुक्रवारी (दि.१६) आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना दिली. त्यानुसार बुधवारी (दि.२१) विशेष ग्रामसभा घेतली जाणार आहे. या ग्रामसभेसाठी तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढणे यामध्ये अनुसूचित जाती व जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण असणार आहे. शुक्रवारी (दि.२३) या प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता देण्यात येईल. सोमवारी (दि.२६) प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होईल. त्यानंतर २७ जून ते ३ जुलै दरम्यान आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत दिली आहे. सात जुलैला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हरकती विचारात घेऊन अभिप्राय घेतला जाईल. तसेच १२ जुलैला जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन अंतिम अधिसूचनेला मान्यता देताना १४ जुलैला अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
इगतपुरी : लक्ष्मीनगर, कृष्णनगर, टाके घोटी, धारगाव, दौडत, शिरसाठे, नागोसली, ओंडली, बोरटेंभे, सोमज, मोगरे, उंबरकोन, आडवन, नांदगाव सदो, कुशेगाव, मोडाळे.
बागलाण : चिराई, भवाडे, केळझर, भाक्षी, मुळाणे, केरसाणे, जामोटी, तताणी.
नाशिक : जलालपूर, महादेवपूर, गंगाम्हाळुंगी, पिंपळगाव. ग, सुभाषनगर
त्र्यंबकेश्वर : सोमनाथनगर, मेटघर किल्ला, साप्ते, सापगाव, हरसूल
कळवण : सरलेदिगर, कोसवण, खडकी, देसगाव, करंभेळक
येवला : लौकी शिरस, शिरसगार लौकी
देवळा : मेशी, माळवाडी, फुलेमाळवाडी
मालेगाव : मांजरे
दिंडोरी : गवळवाडी
निफाड : पालखेड
हेही वाचा :