उत्तर महाराष्ट्र

नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे शहरात मिलेट महोत्सव व सरस प्रदर्शन घेण्यात येणार आहे. यासाठी निधीदेखील राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरड धान्यातून उत्पन्न मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यातील भरड धान्य व्यावसायिक, शेतकरी यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, असा व्यापक दृष्टिकोन या महोत्सव भरविण्याच्या मागे आहे, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले आहे. 

आपल्या देशात फार पूर्वीपासून भरड धान्यांची शेती केली जात आहे. जिल्ह्यातदेखील या भरड धान्य उत्पादनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना अधिकाधिक चालना या महोत्सवातून देण्यात येणार आहे. या धान्याच्या शेतीचे प्रमाण वाढावे, लोकांनी आवडीने त्याचे सेवन करावे हा उद्देश समोर ठेवून हा महोत्सव उभारण्यात येणार आहे. भरड धान्य प्रकारात प्रामुख्याने वाळा-फॉक्सटेल मिलेट, भादली- बार्नयार्ड मिलेट, बाजरी-पर्ल मिलेट, ज्वारी- सोरघम, वरई- प्रोसो मिलेट, नाचणी- फिंगर मिलेट यांचा समावेश होतो. गहू, तांदूळ, मका, बार्ली सोडून जी इतर धान्ये आहेत, ती 'मिलेट' या नावाने ओळखली जातात. ही धान्ये सामान्यपणे आकाराने बारीक, गोलाकार, खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला 'रिफाइन' किंवा 'प्रोसेस' करण्याची गरजच नाही.

जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे होत असलेला हा मिलेट महोत्सव व सरस प्रदर्शन शहरातील डोंगरे वसतिगृह या ठिकाणी २८ एप्रिल ते १ मे या दिवशी होणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात साधारणपणे २५० स्टॉल्स असणार आहे. – आशिमा मित्तल, सीईओ, जिल्हा परिषद,

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT