नाशिक : शासकीय कर्तव्य बजाविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित मायलेकींनी मारहाण केल्याची घटना शहर महिला सुरक्षा विभागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती तुकाराम आमणे (४३) ह्या गंगापूररोडवरील शहर महिला सुरक्षा विभागात समुपदेशन करत होत्या.
त्यावेळी संशयित प्राजक्ता योगेश नागरगोजे (२४, रा. पाटीलनगर, त्रिमुर्ती चौक, सिडको) व सरला बोडके यांनी आमणे यांना शिवीगाळ करत नखाने हातावर ओरखडे ओढून जखमी केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.