नाशिक : पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून एकाने २१ वर्षीय युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित वैभव भाऊसाहेब शेजवळ (२३, रा. कलानगर, म्हसरूळ) याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित वैभवने फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून मुंबई नाका परिसरासह शालिमार, अंबड येथील हॉटेलमध्ये नेऊन वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.