उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादकही चिंतेत

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अचानक बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. ऐन मोहोर येण्याच्या वेळेतच वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी मोहोर जळून गेल्याने पेठ, सुरगाणा, त्र्यंबक आदी भागांत आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवर होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, दिंडोरी या भागांत अनेक शेतकऱ्यांनी केसर आंब्याची लागवड केली आहे. येथील आंब्याला देशी बाजारात चांगली मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून येथील आंब्यांची निर्यातदेखील होऊ लागली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे वेगळे साधन निर्माण झाले आहे. पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केसर, हापूस, लंगडा, राजापुरी या प्रकारच्या आंब्यांची लागवड केलेली आहे. यंदा आंब्याला चांगला मोहोर आलेला असतानाच वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे छोट्या-छोट्या कैऱ्या गळून पडल्या आहेत, तर ढगाळ वातावरणामुळे झाडांवर बुरशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT