देवगाव : येल्याचीमेट - लोणवाडी येथे जळालेला विजेचा ट्रान्सफॉर्मर. (छाया: तुकाराम रोकडे ) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये येल्याचीमेट-लोणवाडीत रोहित्र जळून खाक

अंजली राऊत

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील येल्याचीमेट-लोणवाडी गावांना संयुक्तपणे विद्युत वीजपुरवठ्यासाठी असलेला रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येल्याचीमेट महसुली गाव असून, महावितरण विभागाकडून या गावांना संयुक्तपणे वीजपुरवठा मिळण्यासाठी २५ अश्वशक्तीचा विद्युत रोहित्र बसविण्यात आलेला आहे. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी देवगाव परिसरात सतंतधार पावसामुळे रोहित्र जळून खाक झाले आहे. लोणवाडी, हरीचीवाडी, सरळवाडी व येल्याचीमेट हे त्र्यंबकेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक असून, घनदाट जंगलाची ठिकाणे आहेत. या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. मागील वर्षी टाकेदेवगाव बिबट्याने कोंबड्या, बकऱ्या फस्त केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महावितरण विभागाने कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी रोहित्र दरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विजेअभावी मोबाइल चार्जिंग होत नसल्यामुळे काही नागरिकांची ऑनलाइन कामे खितपत पडली आहेत. विजेअभावी गावातील पिठाची गिरणीदेखील आठ दिवसांपासून बंदच आहे. घरोघरी उज्ज्वला गॅस जोडणी असल्यामुळे रॉकेल मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या पणतीसाठी गोडेतेलाचा वापर नागरिकांना करावा लागत आहे.

रोहित्र जळल्याची माहिती वायरमनला देण्यात आली असून, पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. महावितरण विभागाने लवकरात लवकर आमची मागणी विचार करून नवीन रोहित्र बसवावा. – निवृत्ती पाडेकर, येल्याचीमेट, नागरिक.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT