उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पतीचे अपहरण करून पत्नीला किडन्या विकून टाकण्याची दिली धमकी

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

तुझ्या नवऱ्याच्या किडन्या विकून टाकेल, अशी धमकी देत दोन पुरुष व एका महिलेने पतीचे अपहरण केल्याप्रकरणी पत्नीने अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (२६. रा. अभियंतानगर, कामटवाडे) यांच्या घरी गुरुवारी दुपारी संशयित वैभव माने, त्याचा सहकारी आणि महिला असे तिघे आले. त्यांनी पैशाच्या वादातून भूषण भावसार यांना दुचाकीवर बळजबरीने बसवून नेले. नंतर अश्विनी भावसार यांना फोन करून आजच्या आज साडेसात लाख रुपये आणून द्या नाहीतर तुमच्या पतीच्या किडन्या विकून टाकेल, अशी धमकी दिली. यासंदर्भात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT