उत्तर महाराष्ट्र

नाशिक : दुचाकी डंपरच्या चाकाखाली आल्याने पती-पत्नी गंभीर जखमी

गणेश सोनवणे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पेठ रोडवरील राऊ चौकात सिग्नलवर थांबलेले दाम्पत्य डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघेही पती-पत्नी जखमी झाले असून, पत्नी गंभीर तर पतीलादेखील मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील रामदास यशवंत उगलमुगले व त्यांची पत्नी कौशाबाई रामदास उगलमुगले हे कामकाजानिमित्त नाशिक येथे आले होते. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास घरी जाण्यासाठी राऊ चौकात सिग्नलवर उभे असताना पेठ रोडकडून मखमलाबादकडे डाव्या बाजूला वळण घेणाऱ्या डंपरने (एनएल ०१, क्यू ६५३७) उगलमुगले यांच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकी पुढील चाकाखाली गेल्याने दोघेही पती-पत्नी जखमी झाले. यात महिला डंपरच्या मागील बाजूस फेकली गेल्याने तिच्या पायास मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून, पतीच्या हातापायांना फ्रॅक्चर झाले झाले.

दोघांनाही दिंडोरी रोडवरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी जखमींना गाडीखालून बाहेर काढले. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT