उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरात विस्तारणार गॅस वितरणाचे जाळे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक व आजूबाजूच्या भागांत गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक व स्वच्छ ज्वलनशील अशा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) या स्वरूपात नैसर्गिक वायू मिळत असून, लवकरच या वितरण व्यवस्थेचा नाशिक शहर तसेच जिल्ह्यात विस्तार होणार असल्याचे एमएनजीएल कंपनीने म्हटले आहे.

आजमितीस एमएनजीएल सुमारे वीस स्टेशन्सद्वारे नाशिक आणि आसपासच्या भागात सुमारे सात हजार वाहनांना सीएनजी पुरवठा करते. यामध्ये ऑनलाइन सीएनजी स्टेशन्सचा समावेश आहे. एमएनजीएलने नाशिक क्षेत्रात पंधराहून अधिक उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांसह घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा सुरू केला. नाशिक भौगोलिक क्षेत्रामध्ये कंपनीने सुमारे ३०० अधिक किमीचे स्टील आणि मध्यम दाबाचे वायुवाहिनींचे जाळे तयार केले आहे.

नाशिक महापालिका परिवहन महामंडळाच्या सुमारे २०० बसेस सीएनजीवर धावत आहेत. सध्या अंबड एमआयडीसी, पाथर्डीफाटा, सातपूर, इंदिरानगर, बिटको रोड, नाशिकरोड, जेलरोड, सोमेश्वर रोड, अंबड-सातपूररोड, सिन्नर, इगतपुरी आदी भागांत सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करत आहे. चांदवड परिसरातही पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे.

वायुवाहिनी प्रकल्प नाशिकमधून

नाशिकच्या जवळपास कोणतीही नैसर्गिक वायूवाहिनी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कंपनीने सीएनजी पुण्यातून कॅस्केडद्वारे गाड्यांमधून ट्रान्स्पोर्ट करून नाशिकमध्ये वितरण सुरू केले. सध्या गेल (इंडिया) लिमिटेड मुंबई-नागपूर-झारसुगुडा या मार्गावर नैसर्गिक वायू पाइपलाइन प्रकल्प विकसित करत असून, हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. २०२३-२४ मध्ये प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. कंपनीद्वारे गुजरातमधील 'दहेज एलएनजी टर्मिनल'हून एलएनजी नाशिकला ट्रान्स्पोर्ट करून त्याचे री-गॅसिफिकेशन करण्यात येते. एलएनजी सुविधा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी, नाशिक येथे आहे. एमएनजीएलचे हे एलएनजी स्टेशन भारतातील प्रमुख अत्याधुनिक सुविधांपैकी एक आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT